अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या एअर शोमध्ये(Air Show) सूर्यकिरण टीम सादर केलेल्या कवायती आकर्षणाचा केंद्र ठरल्या. श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. सारंग टीमच्या वैमानिकांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चित्तथरारक कसरती आणि आकाश गंगा स्काय डायव्हिंग टीमचे तिरंगा फॉर्मेशन यामुळे नागपुरातील एअर शो मध्ये सर्वजण चकित झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ‘एनसीसी’च्या ‘कॅडेट्स’ने ‘एअरोमॉडेलिंग’मधून दाखविलेली हवेतील युद्धाचे प्रात्यक्षिकही लक्षणीय ठरली आहेत. सूर्यकिरण विमानांनी एकाहून एक थरारक कवायती सादर केल्या. प्रचंड वेगात असताना देखील हवेतच कोलांटी. हार्ट शेप...cross करताना असे वेगवेगळे श्वास रोखून धरणाऱ्या कसरती सादर केल्या.


‘आकाशगंगा’ ही स्काय डायव्हिंग करणा-या वायुसेनेची तीनच्या जोडीने आलेल्या चमूने तर अवकाशात तिरंगा सादर केला व अवघ्या काही फुटांवर ते एकमेकांपासून वेगळे झाले. भारतीय हवाई दलाच्या हवाई कसरती करणाऱ्या सारंग हेलिकॉप्टर पथकाने तर ‘एअर शो’मध्ये आणखी थरार आणला.


चार ‘हेलिकॉप्टर्सचा यात समावेश होता. विशिष्ट प्रकारे डिझाइन केलेल्या पंख्यांमुळे ध्रुव हेलिकॉप्टरमधून विविध प्रकारच्या कसरती करणे शक्य होते तसेच लष्करी वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. 
एकमेकांच्या समोर येत ‘क्रॉस’ करणे, अलगदपणे हेलिकॉप्टरची दिशा बदलत त्याला लंबरेषेत वर घेऊन जाणे, हवेत ‘हार्ट शेप फॉर्मेशन’ करणे इत्यादी कसरती या चमूने केल्या.