Airtel cheapest 365 days Plan: स्वत दरात वर्षभर फ्री काँलिंग, डेटा प्लान देणाऱ्या टेलिकाँम कंपन्यांमध्ये जिओचे नाव आधी घेतलं जात. गेली अनेक वर्षे जिओने यूजर्सच्या मनावर अधिराज्य केलंय. पण आता एअरटेलमुळे जिओचं टेन्शन वाढणार आहे. एअरटेलने असा प्लान आणलाय, ज्यामुळे जियोच्या सत्तेला हादरा बसू शकतो. जिओचे यूजर्स एअरटेलमध्येदेखील पोर्ट करु शकतात. अशी काय आहे ही ऑफर? सविस्तर जाणून घेऊया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. देशभरातील अंदाजे 380 दशलक्ष यूजर्स एअरटेल वापरतात. एअरटेल आपल्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी दरवेळेस खास प्लान आणत असते. एअरटेल आपल्या महिन्याचा, वार्षिक रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सचे पैसे वाचतील, याची काळजी घेते. मासिक रिचार्जपेक्षा जास्त वैधता पाहिजे असलेले युजर्स वार्षिक प्लान निवडतात. यातही त्यांना डेटा, कॉलिंग आणि बऱ्याच सुविधा मिळतात. 


एअरटेचा नवा परवडणारा प्लान 


Airtel ने 1 हजार 999 रुपयांचा एक अतिशय चांगला रिचार्ज प्लान आणला आहे. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभर रिचार्जचं टेन्शन घेण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स मिळतील आणि दररोज 100 फ्री एसएमएसही मिळतील. जे जास्त कॉल करतात आणि कमी डेटा वापरतात त्यांच्यासाठी हा प्लान खूप चांगला आहे.


तुमच्या घरी, ऑफिसमध्ये वायफाय असेल तर तुमचा मोबाईल डेटा कमी खर्च होतो. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी 24जीबी डेटा मिळेल. म्हणजेच दरमहा 2GB डेटा मिळेल. तसं पाहायला गेलं तर सध्याच्या काळात हा डेटा खूपच कमी आहे. पण जास्त डेटा वापरत नसणाऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. काही जण घरचा फोन फक्त कॉलिंगसाठी वापरतात, अशावेळी एअरटेलचा हा प्लान खूप फायदेशीर ठरतो. 


या प्लॅनमध्ये काँलिंग, डेटासोबत तुमच मोफत मनोरंजनदेखील होणार आहे.  तुम्हाला एअरटेल स्ट्रीम मिळेल. तुम्हाला मोफत Hello Tunes देखील मिळेल. तुम्ही अनलिमटेड कॉल आणि एसएमएस करु शकता. तुम्हाला अपोलो 24/7 सर्कलचा लाभ मिळतो. ज्यात हेल्थ बेनिफिट मिळतील.


रिलायन्स जिओचा 336 दिवसांचा प्लान


तुम्ही रिलायन्स जिओचे यूजर्स असाल तर 1 हजार 899 रुपयांचा मिळेल. जो 336 दिवसांसाठी असून ज्यामध्ये 24 GB डेटा मिळेल. यात रोज अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस मिळतील. दोन्ही प्लानची तुलना केल्यास एअरटेलचा प्लान फायदेशीर ठरतो. कारण थोडे जास्त पैसे खर्च करुन तुम्ही वर्षभराचा प्लान मिळवू शकता.