बारामती : 'डॉक्टर एकीकडे तुम्हीच सांगता हस्तांदोलन करु नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता.'  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून केला नमस्कार केला. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी अजित पवार यांनी दुरूनच नमस्कार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरिक करीत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दाखविली. बारामतीत झालेल्या आज विविध कार्यक्रमांदरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करीत तुम्ही देखील असाच हात जोडून कोरोनोपासून बचाव करण्याचासाठी सल्ला उपस्थितांनी दिला,


'उपमुख्यमंत्री झाल्याने मी काही वेगळा झालो आहे असे काहींना वाटेल पण डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करीत असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. बारामतीत डॉ. रमेश भोईटे यांनी आयोजित केलेल्या मोफत कर्करोग निदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी हा खुलासा केला. 


पवार यांच्या हस्ते आज बरेच सत्कार झाले, अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र हात जोडून पवार यांनी नम्रतेने आणि हसत हस्तांदोलन टाळले. डॉक्टर एकीकडे तुम्हीच सांगता हस्तांदोलन करु नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांनाही हळूच चिमटा काढला.


मात्र जो पर्यंत कोरोना संपूर्णपणे जात नाही तो पर्यंत आपण हस्तांदोलन करणार नाही, असा खुलासा करायलाही अजित पवार विसरले नाहीत. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत आहे. आज देखील केरळमध्ये कोरोनाचे ५ रूग्ण अढळले आहेत. त्यामुळे भरतीयांच्या मनात देखील कोरोना बद्दल भीती निर्माण होत आहे. 


तर भारतात आतापर्यंत ३९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभारातील मृतांचा आकडा ३ हजार ४०० वर पोहोचला आहे. ९० देशांतील १ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.