मुंबई : Ajit Pawar On Devendra Fadnavis : कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोले लगावले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला? तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा, असा घणाघात अजित पवार यांनी आज सरकारवर केला. तर अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या दोन पत्रकार परिषदांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माईक खेचून घेण्यावर आणि चिठ्ठी पाठवण्यावरून टीका झाली होती. त्यावरून फडणवीस यांनी कोपरखळ्या लगावल्या. आम्ही सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या पुढ्यातील माईक घेतला नव्हता, असा टोला अजित पवार यांनी हाणला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.


तसेच नवीन सरकारने बहुमतावर सर्व गोष्टी केल्या मग मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही, पूरपरिस्थिती असताना तातडीने पालकमंत्री नेमून त्यांच्यावर तेथील जबाबदारी द्यायला हवी, पालकमंत्र्यांनीही सरकारी यंत्रणेला विश्वासात घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे. माझेही मुख्यमंत्र्यांना जनतेच्यावतीने आवाहन आहे, मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, असे अजित पवार म्हणाले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांनी जनता दरबार भरवलाय. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. नागरिकांनी आपल्या समस्यांचं निवेदन पवार यांच्याकडं दिलं. तर अजित पवार यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचे आदेश दिले.


'सरपंचच कशाला राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा'


महाविकास आघाडी सरकारने निवडून आलेल्यांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता. नव्या शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय बदला. आता जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केला. नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याच्या भूमिकेबाबत त्यांनी टोला लगावला. दोघांच्या मंत्रिमंडळाला निर्णय फिरवण्याची खूप घाई झालेली दिसते अशी टीकाही अजितदादा यांनी केली.