लालबाग राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारणे हे सरकारचं अपयश - अजित पवार
लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे
पुणे : लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे, असं विधान अजित पवारांनी केलंय. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, ही चूक ज्यानं कुणी केली असेल, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, तरच पोलिसांचा दबदबा राहील, असं अजित पवार म्हणालेत. तर लालबाग मंडळात भक्तांना वाईट वागणूक दिली जाते. मात्र तिरूपती बालाजीला एवढी मोठी गर्दी नियंत्रित केली जाते तर मग लालबागमध्ये का नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय.
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. राजाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना कार्यकर्त्यांच्या अरेरावीला सामोरं जावं लागतंय. अगदी दूरवरुन राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना राजाच्या दरबारात धक्काबुक्की सहन करावी लागतेय. कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्कीला भाविक एवढे कंटाळलेत की पुन्हा लालबागच्या दर्शनाला येणार नाही, असं भाविक सांगतायत