पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना अजितदादांकडून मोठा दिलासा, केली ही घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली ही महत्त्वाची घोषणा
पुणे : लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत समज-गैरसमज झाले. जो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलाय तोच निर्णय कायम राहणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने पुणे, पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन अधिक शिथिल होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काळी बुरशी घालवण्यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची अजूनही कमतरता आहे. खडकी तसेच पुणे कन्टेन्मेंट मधील दुकाने पुण्याप्रमाणे खुली होणार आहेत. देहूरोड कन्टेन्मेंटला सवलत देता येणार नाही. अशी माहितीही त्यांनी दिली.
याआधी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय़ घेतला होता. सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत खुली राहणार आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर आर्थिक व्यवहार आणखी सुरळीत होण्यास मदत होईल.
पाहा संपूर्ण पत्रकार परिषद