सोलापूर : करमाळ्यात राष्ट्रवादीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अधिकृत उमेदवारांनेच नेते अजित पवार यांनाच आव्हान दिले आहे. अजित पवार यांनी करमाळ्यात मला मदत केली किंवा नाही केली, तरी फरक पडत नाही, थेट इशाराच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी काल एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्याच संजय पाटील घाटणेकर या उमेदवाराने त्यांना आव्हान दिले आहे. दरम्यान, काल निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र काहींनी बंडखोरी करत आपले अर्ज मागे घेतलेले नाहीत. मात्र, पंढरपूर येथे राष्ट्रवादीसमोर मोठी नामुष्की ओढवली आहे. या ठिकाणी अधिकृत उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. मात्र, संजय पाटील घाटणेकर यांनी अर्ज मागे घेतला नाही. 


राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक मतदारसंघात बंडोबाना शांत करण्यासाठी मनधरणी सुरू होती. कारण पक्षाच्या अधिकृत उमेदवारास फटका बसू नये यासाठी प्रयत्न सुरु होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवारास पाठींबा न देता अपक्षा पाठींबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांना हे वक्तव्य महागाड पडण्याची शक्यता आहे.


करमाळ्यात राष्ट्रवादीने शेतकरी नेते संजय पाटील घाटणेकर यांना उमेदवारी दिली. त्यांना एबी फाॅर्मही दिला. पण तो उमेदवारी अर्ज माघारी घेणे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना काही जमलेले नाही. आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी करमाळ्यात राष्ट्रवादी ऐवजी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा प्रचार करणार आहेत.


अजित पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी आव्हान दिले आहे. पक्षाच्या उमेदवारास मदत न करता अपक्षाला मदत करण्यासाठी सांगणे हे दुर्दैवी आहे. तसेच अजित पवारानी करमाळ्यात मदत केली किंवा नाही केली, तरी काहीही फरक पडत नाही, असे पाटील घाटणेकर यांनी म्हटले आहे.