नांदेड : हल्लाबोल यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्ताधा-यांवर तुटून पडलेत. शनिवारी अजित पवारांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. आज नारायण राणे यांचा चांगलाच समाचार घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था राणेंची झालीये. भाजपाच निवडणूक चिन्ह बदलून गाजर केलं पाहिजे, असा टोला अजीतदादांनी हाणला. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे आयोजीत सभेत पशुसर्वंधन मंत्री महादेव जानकर यांनाही टोला लगावला.


राणेंनीही दिला होता भाजपला इशारा


मंत्रीमंडळ विस्तारावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे संतप्त झाले होते. त्यांनी  भाजपला स्पष्ट इशारा दिला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी जाहीर केले होते की, राणे यांना योग्यवेळी स्थान दिले जाईल. मात्र, तीन तारखा काढूनही राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. यावरुन राणे यांना सवाल करण्यात आले असता, राणे यांनी भाजपला स्पष्ट शब्दात इशारा दिला. माझा अंत पाहू नका, असं नारायण राणे म्हणाले होते.


पाहा काय म्हणाले अजित पवार