सातारा : कोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचा भाषणातील अयोध्याचा मुद्यावर बोलताना फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जाता येत नसल्याने हे अयोध्येला निघाले आहेत तेथे जाऊन काय दिवे लावणार आहे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  सभेत अजित पवार बोलत होते. युती सरकारचे मंत्री बावचळून गेले आहेत. यांनी घरपोच दारू द्यायचा निर्णय घेतला आहे. यांच्या बापाने घरपोच दारू दिली होती का, अशी  टीका  केली. अजित पवारांनी राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. पोरी काय यांच्या बापाचा आहेत का? असा प्रश्न देखील विचारला आहे.