Ajit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...
Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली. सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे.
Ajit Pawar Net Worth: बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली. सुनेत्रा पवार अब्जाधीश आहेत.. सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता 123 कोटी 46 लाख 17 हजार 758 रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे आहे.
सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आलीय.. सुनेत्रा पवार यांनी त्यांची नणंद आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळेंना 35 लाख तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना 50 लाख, अजित पवार यांना 63 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज दिल आहे.
सुनेत्रा पवार यांची संपत्ती
रोख रक्कम : 3 लाख 14 हजार 450
बँक ठेवी : 2 कोटी 97 लाख 16 हजार 180
शेअर्स : 15 लाख 79 हजार 110
बचत योजना : 50 लाख 76 हजार 877
कर्ज : 12 कोटी 11 लाख 12 हजार
येणे बाकी/ हक्क मागण्या : 6 कोटी 5 लाख 18 हजार 116 रुपये
वाहने : एक ट्रॅक्टर, दोन ट्रेलर (एकूण किमत 10 लाख 70 हजार)
सोने चांदी व मौल्यवान वस्तू
चांदी - 76.6 किलो (किमत - 24 लाख 99 हजार 555 रुपये.)
सोने 1030 ग्रॅम (किंमत 51 लाख 84 हजार 60 रुपये)
हिऱ्यांचे दागिने 28 करेंट (किंमत 24 लाख 50 हजार 920 रुपये.)
शेतजमीन : 44 एकर 22 गुंठे
मुंबई आणि पुण्यात घर शुभदा अपार्टमेंट, वरळी,मुंबई :- 1 हजार 119 चौरस फूट किंमत 4 कोटी 50 लाख 80 हजार 500 रुपये
झिरोजी अपार्टमेंट, कल्याणनगर, पुणे :- 3 हजार 821 चौरस फूट किंमत 4 कोटी 5 लाख 24 हजार 674 रुपये
सिंध हौसिंग सोसायटी, पुणे :- (15 हजार 10 चौरस फूट किंमत 10 कोटी 17 लाख 37 हजार 913 रुपये
सोबा सवेरा ए विंग बिबवेवाडी, पुणे. 8 हजार 880 चौरस फूट किंमत 4 कोटी 31 लाख 51 हजार 354 रुपये
जंगम मालमत्ता : 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये
स्थावर मालमत्ता :- 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपये