Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळ नाराज असल्याचे समजतेय. तशी कबुलीदेखील त्यांनी दिली होती. आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर दोघा नेत्यांची भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावरुन भुजबळ भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवारांनाही यावर प्रश्न विचारला असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांना भुजबळांचा प्रश्न का सोडवला जात नाही, असा सवाल केला असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले आहे. हा आमचा पक्षाचाअंतर्गंत विषय असून तो आमचा आम्ही सोडवू, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे या विषयावर बोलणं टाळलं आहे. 


दरम्यान, अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी जिल्ह्याच्या समस्यांबाबत आढावा घेतला. ट्रॅफीक समस्येवर १५ दिवसांनी बैठक घेणार आहे. पुणेकरांना ट्रॅफीक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यावर  सर्व विभागांची बैठक आयोजीत केली आहे. पुणातील केईम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी जागा सोडायची तयारी दर्शवली आहे. त्यांना महापालिका दुसरीकडे जागा उपलब्ध करुन देईल, असं त्यांनी म्हटलं आहे. 


भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीतः तटकरे


भुजबळ साहेब भाजपात जात आहेत ही अफवा फक्त आपल्यामध्येच आहे. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत इतक्या वर्षाचा अनुभव पाहता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते फडणवीस साहेब यांना भेटायला गेले आहेत. त्याच्यापेक्षा अधिक यामध्ये समजण्याचे कारण नाही. राज्याच्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात फडणवीस यांना भेटायला गेलेत यापेक्षा जास्त निकष लावण्याच कारण नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.