Ajit Pawar, Maharastra Politics:  महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घडामोड घडली आहे. शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. शिवेसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात उभी भूट पडली आहे. राषट्रवादीचे दिग्गज नेते तथा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच राष्ट्रवादीपक्ष फोडला आहे. शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 


अजित पवार यांचे राष्ट्रवादीत मोठे बंड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली होती. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी यानी शरद पवार यांच्याकडे केली होती. तसेच अजित पवार यांनी 1 जुलै पर्यंतचा अल्टीमेटम देखील दिला होता. मात्र, अजित पवार यांच्या मागणीची राष्ट्रवादी पक्षाकडून दखल घेण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी थेट बंडाचे हत्यार उपसले आहे.


अजित पवार यांचा पहाटे नंतर दुपारचा शपथविधी


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभ फूट पडली. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवारांसह राजभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी शपथ घेतली.. तेव्हा राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. एकाच टर्ममध्ये अजित पवार तिस-यांदा उपमुख्यमंत्री बनलेत. अजित पवारांसोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांनीही शपथ घेतली.


भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली


मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपचं फिस्कटलं होतं. चर्च्यांच्या फे-या होत होत्या पण तोडगा निघत नव्हता. अशात  23 नोव्हेंबर 2019 ला भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याच्या प्लॅनला शरद पवारांनी आधी मान्यता दिली होती, मात्र नंतर माघार घेतली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. पहाटेचा शपथविधी अपघात नव्हता, तर नियोजित प्लॅन होता, असंही फडवीस म्हणाले.


महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार दुसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ


महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांनी  दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.  शिवसेना-भाजपचं फिस्कटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.