महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 40 आमदारांसहीत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याबरोबरच अन्य 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. म्हणजेच शिंदे सरकारबरोबर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला एकूण 9 मंत्रीपदं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील 9 जणांकडे आधीपासूनच मंत्रीपद आहे. तर भाजपाचेही 9 नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्याचप्रमाणे आता अजित पवारांबरोबर आलेल्या 40 आमदारांपैकी 9 जणांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. या नव्या मंत्र्यांची खाती जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र आता शिंदे सरकारमध्ये एकूण 27 मंत्री झाले असून 9-9-9 चा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. सध्याच्या शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये कोणकोण मंत्री आहेत पाहूयात...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडची खाती :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या म्हणजेच अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याआधी सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत.


फडणवीस यांच्याकडे कोणती खाती?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजित पवारांच्या आजच्या शपथविधीआधी गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत.


शिंदे गटाचे मंत्री :


1) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता


2) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म


3) संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन


4) संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन


5) उदय सामंत- उद्योग


6) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण


7) अब्दुल सत्तार- कृषी


8) दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा


9) शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क


अजित पवारांबरोबर आलेल्या गटातील मंत्री :


1) अजित पवार (उपमुख्यमंत्री)


2) छगन भुजबळ


3) दिलीपराव वळसे-पाटील


4) हसन मुश्रिफ


5) धनंजय मुंडे


6) धर्मरावबाबा  आत्राम


7) अदिती तटकरे


8) संजय बनसोडे


9) अनिल पाटील


भाजपचे मंत्री :


1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास


2) सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय


3) चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य


4) डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास


5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण


6) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


7) सुरेश खाडे- कामगार


8) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण


9) अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण