बैठकीला अधिकारी उशिरा आल्याने अजित पवार नाराज
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज मराठवाड्याची बैठक घेणार आहेत.
औरंगाबाद: मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याची बाब समोर आली आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज मराठवाड्याची बैठक घेणार आहेत. मराठवाड्यातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित असतील. तत्पूर्वी अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार होते. या बैठकीसाठी सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक अधिकारी या बैठकीला आलेच नाहीत. तर काहीजण वेळेनंतर या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याचे समजते.
दरम्यान, मराठवाड्यातील आजच्या बैठकीला सर्व मंत्री हजर असतील. मराठवाड्याच्या मागण्या आणि येत्या आर्थिक वर्षात मिळणार निधी याबाबत या बैठकीत चर्चा होईल. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा औरंगाबादेत आढावा बैठक घेतली होती.
तुकाराम मुंढे नागपूर पालिकेत दाखल, उशिरा पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना खडसावले
तत्पूर्वी अजित पवार आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये महत्वाची भूमिका असलेल्या औरंगाबादमधील ऑरीक सिटीला भेट दिली. मुख्य प्रशासकीय इमारतीचा पाहणी करताना आतापर्यंत याठिकाणी झालेल्या गुंतवणुकीचीही माहिती त्यांनी घेतली. तसेच येणाऱ्या अडचणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली.
इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता- जितेंद्र आव्हाड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ मध्ये ऑरिक सिटीच्या मुख्यालयाचे उद्घाटन झाले होते. स्मार्ट सिटी असलेली ऑरिक सिटी ही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरला जोडलेली असेल. याठिकाणी विविध कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये उभारण्याची योजना होती. मात्र, आतापर्यंत यासाठी म्हणावी तशी गुंतवणूक झालेली नाही.