गुजरातच्या निकालावर अजित पवार म्हणाले...
गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आलं असताना, अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आलं असताना, अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या काळात, परिस्थिती आणखी बदलेले-अजित पवार
अजित पवार यावर बोलताना म्हणाले, सुरूवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये 150 जागांशिवाय बोलूच नका, पण सुरूवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी बनवली होती, तेव्हा सर्व जगाने पाहिलं, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे.
जनता मी सांगेल ते पूर्वदिशा सहन करणार नाही- अजित पवार
मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापी सहन करत नाही. येणाऱ्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल, किती बारकाईने विचार करून लोक मतदान करतात, मला खात्री आहे, जेथे जेथे विरोधीपक्ष काम करतोय, तेथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.