वीज दरवाढीवर अजित पवार म्हणाले...
गरीब व लहानांना सवलत देत असताना इतरांच्या विजेचा दर वाढवता कामा नये. याचा विचार केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
मुंबई : महावितरण पार बुडीत अवस्थेत गेली आहे. त्यामुळे महावितरणने 35 टक्के दरवाढ मागितली आहे. त्याचा भार सामान्य ग्राहकांवर पडणार आहे. काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काही अंशी दरवाढ करण्याचे सूतोवाच आधीच केले आहे. मात्र, या वीज दरवाढीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेचा दर वाढता नये असं म्हटलंय.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज दरवाढीचे संकेत दिले आहेत. मात्र, गरीब व लहानांना सवलत देत असताना इतरांच्या विजेचा दर वाढवता कामा नये. याचा विचार केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
वीज दरवाढीचा प्रस्ताव अजून माझ्यापुढं आलेला नाही. मात्र, प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
कायदे समान हवेत...
देशात काही ठराविक लोक बँकांना फसवत आहेत. आताच २८ बँकांना काहीजण चुना लावून परदेशात पळाले. सामान्य लोकांना मात्र कर्ज न फेडल्यास वेगळा न्याय आणि २८ बँकांना फसवणाऱ्यांना वेगळा न्याय असे का ? कायदे सर्वांना समान असले पाहिजेत. बँकेत चुका होत असताना बँक स्टाफला प्रथम कळते. त्यामुळं सहकारात संवेदनशीलता हवी.
आता २८ बँकांना काही हजार कोटींना चुना लावण्याचे प्रकरण गाजतंय. गेल्या काही वर्षात साडेपाच लाख कोटी बुडवले गेले. काही मुठभर लोक त्याचा गैरफायदा घेते आणि कष्टकरी जनता मात्र पै पै जमा करून कर्ज भरते. हा विरोधाभास दिसतो. सामान्य लोकांना कर्ज देताना जसं जामिन घेता, पेपर घेता. तसं मोठ्या लोकांचे जामिन घेत नाही का. जेवढे कर्ज असेल तर तेवढे जामिन घ्यायला हवे.