Shirur Lok Sabha constituency: राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अजितदादांचे खास... विलास लांडेंच्या (Vilas Lande) वाढदिवसानिमित्त भोसरीत भावी खासदार अशी पोस्टर्स लागली अन् शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) जागी राष्ट्रवादी (NCP) भाकरी फिरवणार का? अशी चर्चा अचानक सुरु झाली. अमोल कोल्हेंच्या जागेवर आपण इच्छुक (NCP Candidate Lok Sabha) असल्याच्या चर्चांना खुद्द लांडे यांनीच दुजोरा दिला. त्यात आता अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिरुरवरुन गुगली टाकलीय. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.


काय म्हणाले अजित पवार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणाला उमेदवारी द्यायची, हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाला वाट्याला येतात, हे प्रथम निश्चित होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल, असं अजित पवार (Ajit Pawar On Amol Kolhe) म्हणाले. तर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या निर्णयावर विश्वास दाखवला.


विलास लांडे पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपशय आले होते. त्यांनी आता गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल, असंही अजित पवार म्हणाले आहेत. शिरुरच्या लोकसभा सीटवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत.


आणखी वाचा - एक घाव दोन तुकडं! अहमदनगरचं नामांतर भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व?


आता फक्त अजित पवारांच्या दाव्यामुळेच कोल्हे गॅसवर नाहीत. अजित पवारांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी चांगल्या उमेदवाराचा उल्लेख करत सस्पेन्स आणखी वाढवला. त्यामुळे आता शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाकरी फिरवणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.


अमोल कोल्हे म्हणतात...


दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटलांच्या दाव्यावर डॉ.अमोल कोल्हेंनीही (Amol Kolhe On Shirur Lok Sabha constituency) खास शैलीत प्रतिक्रिया दिली. या सगळ्या चर्चांवर माझं एकच उत्तर आहे. आमच्यासाठी शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... एखाद्या मतदार संघावर कुठलाही दावा करणं किंवा छातीठोकपणे सांगणं तर्कसंगत नाही, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला होता.