Ajit Pawar : पवार कुटुंबीयांची दिवाळी यंदा बारामती ऐवजी पुण्यात साजरी करण्यात आली. शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले होते.  यानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चा रंगलेय ती अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीत सध्या राजकीय उलथापालथींना वेग आलाय. डेंग्यूमुळे अनेक दिवस घराबाहेर न पडलेले अजित पवार शुक्रवारी अचानक शरद पवारांना भेटले. पवार कुटुंबाच्या पुण्यातल्या दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान अजित पवार-शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर अजित पवारांनी तातडीनं दिल्लीत जाऊन अमित शाहांचीही भेट घेतली. याचदरम्यान शरद पवारांचं एक विधान समोर आलंय, ज्यामुळे चर्चांना उधाण आलंय.. शरद पवारांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वेळप्रसंगी संकाटालाही तोंड द्यावं लागतं असं विधान पवारांनी केलं..


दरम्यान, अजित पवार हे शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मोठं विधान रवी राणांनी केले होते.  राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. त्यात शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली आणि पवारांनी संकटांचा उल्लेख करत सूचक विधान केलं.


अजित पवारांसोबत कौटुंबिक कार्यक्रमात झालेली भेट, त्यानंतर अजित पवार-अमित शहांची भेट आणि शेवटी शरद पवारांनी केलेलं सूचक विधान यामुळे पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरु झालीय.


काका पुतण्या एक होणार?


अजित पवार दिल्लीला जाण्यापूर्वी आज दुपारी पुण्यात पवार कुटुंब एकत्र आलं. पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची दिवाळी साजरी करण्यात आली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे दिवाळीसाठी एकत्र आले होते. सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एक होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय. 


पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट दिल्ली गाठली


काका-पुतण्याच्या या भेटीमुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट राजधानी दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीत नेमकं काय घडलं, त्यावरुन चर्चांना उधाण आलंय.