मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्या आमदारांना विधानसभा बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. सध्या ट्रायडंट हॉटेलच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अजित पवार उपस्थित राहणार होते. पण ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. असे असले तरी अजित पवारांच्या समर्थकांची ट्रायडंट हॉटेल बाहेर पोस्टरबाजी पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार वुई लव्ह यू असे असे पोस्टर्सवर लिहिलेले समर्थक ट्रायडंट हॉटेलबाहेर दिसत आहेत. एकच वादा, अजित दादा अशा घोषणा देखील हे समर्थक देत आहेत. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पवार  यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पवार जिंदाबाद घोषणा डेट आहेत शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार का ? हा महत्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते येत आहेत. 


त्यांच्यासमोरचे काय पर्याय आहेत यावर आता खलबत रंगली आहे. विधीमंडळ नेतेपदाचे पत्र घेऊन अजित पवार भाजपला जाऊन मिळाले. आपल्याला आमदारांचा पाठींबा असल्याचे त्यांनी राज्यपालांसमोर दाखवून दिले. पण जसजसे दिवस उलटले तसे अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते स्वगृही परतले. राष्ट्रवादीच्या विश्वासआर्हतेवर यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीत परतीचे मार्ग अजित पवारांनी स्वतः बंद केलेले आहेत. 



तीन दिवस राष्ट्रवादीचे नेते त्यांची मनधरणी करत होते मात्र अजित पवार तयार झाले नाहीत. त्यामुळे आता राजकीय संन्यास घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय दिसत नसल्याचे दिसत आहे. 


ट्रायडंट हॉटेलवर होत असलेल्या बैठकीत तीन्ही पक्षांचे नेते उपस्थित असल्याने कदाचित अजित पवार तिथे उपस्थित राहणार नाहीत असे सांगितले जात आहेत. पण बैठक संपल्यावर अजित पवार हे शरद पवार आणि कुटुंबाची भेट घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.