`मी अजित अनंतराव पवार...`, महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Ajit Pawar Deputy CM: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेते. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. अजित पवार यांनी दुपारी 2.30 वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार वगळता सर्वांनीच त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षांतर्गत विरोधानंतर निर्णय़ मागे घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी 1 जुलैपर्यंत अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.
कोणी शपथ घेतली आहे?
- अजित पवार
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे पाटील
- हसन मुश्रिफ
- धनंजय मुंडे
- धर्मा आत्रम
- आदिती सुनील तटकरे
- संजय बाबुराव बनसोडे