अजित पवार मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरी यांच्यानंतर सुनील तटकरे याचे महत्त्वाचं वक्तव्य
सत्तेत सहभागी होताना मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टता झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं अत्यंत महत्त्वाचं विधान.
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अमोल मिटकरी यांच्यानंतर आता सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा अजिच पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला जोर आला आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे
मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय... सत्तेत सहभागी होताना मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टता झालीय. आता मुख्यमंत्रीपदाचा विषय नाही, असं तटकरेंनी स्पष्ट केलंय. एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. त्याबाबत विचारणा केली असता, राष्ट्रवादीनं महायुतीत काम करण्याचं निश्चित केलंय, असं तटकरेंनी सांगितलं.
'अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची इच्छा'
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सुनील तटकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा आता विषय नाही असे तटकरे म्हणाले. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, महायुतीत काम करण्याचं निश्चित केले आहे. एनडीएसोबत काम करण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे असे देखील तटकरे यांनी स्पष्ट केले.
अमोल मिटकरी यांनी काय ट्विट केले होते?
लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा दावा मिटकरी यांनी केलाय. अजित पवार यांचा वाढदिवसादिवशी मिटकरी यांनी एक लक्षवेधी ट्वीट केले होते. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.. अमोल मिटकरींनी व्हिडिओ शेअर करून लवकरच अजितपर्व सुरू होणार असल्याचा दावा केला होता. यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या.
भाजपनं शिंदेंच्या विसर्जनाची तयारी सुरू केलीय - संजय राऊत
शिवसेना शिंदे गटानं कितीही दावे केले तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. उलट भाजपनं शिंदेंच्या विसर्जनाची तयारी सुरू केलीय, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलाय. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचंही त्यांनी सांगितलं. पिंपरी मध्ये शिवसेनेच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला राऊत आणि सचिन अहिर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत सातत्याने अफवा उठवण्याचं काम उद्धव ठाकरे गट करतोय असा आरोप नितेश राणेंनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या किचन कॅबिनेटमधला एक अतिशय जवळचा नेता शिंदेगटाच्या वाटेवर असल्याचंही ते म्हणाले.
जनमनातील मुख्यमंत्री अजितदादा पवार
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले होते. देवळाली प्रवरा हे अजित पवारांचं अजोळ असून, इथं लावण्यात आलेल्या बॅनर्सवर 'जनमनातील मुख्यमंत्री अजितदादा पवार', असा मजकूर छापण्यात आला होता. या बॅनरवर शरद पवारांचाही यांचाही फोटो होता.