Chhagan Bhujbal React On Sharad Pawar Comment: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वपक्षाविरोधात बंड करत थेट राज्यातील सत्ताधारी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत राजकीय भूकंप घडवला. या निर्णयानंतर अजित पवार विरुद्द शरद पवार गट असा नवा सत्तासंघर्ष राज्यात सुरु झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांबरोबर शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यासारखे नेतेही बंडात सहभागी झाले आहेत. शरद पवारांनी यासंदर्भात बोलताना बुधवारच्या मुंबईत बैठकीमध्ये 'काय चाललंय बघून येतो म्हणत भुजबळ गेले आणि शपथविधीला पोहोचले' असं म्हणत टीका केली. शरद पवारांनी यापूर्वीही बंडानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांबरोबरचा हा संवाद सांगितला होता. आता याच संवादासंदर्भात भुजबळ यांनी खुलासा केला आहे.


शरद पवारांच्या त्या विधानावर भुजबळ काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना "जाऊन बघून येतो म्हणून थेट शपथविधीला गेले असा आरोप शरद पवारांनी केला आहे," असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला तोडगा काढण्याचा असं भुजबळ म्हणाले. "आम्ही शेवटपर्यंत काही मार्ग निघतो का असा प्रयत्न आम्ही केला. सुप्रियाताई सुद्धा तिथे होत्या. हे प्रयत्न सर्व आमदार, अजितदादा, इतर नेतेही होते. जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली. मागील दोन महिन्यात बऱ्याच बैठका झाल्या. साहेबांबरोबरही चर्चा झालेली. काल काही गोष्टी अजितदादांनीही उघड केल्या आहेत. तिथे गेल्यानंतर शेवटचा मार्ग निघतो का याचा प्रयत्न जरुर केला. मार्ग निघाला नाही म्हणून आम्ही पुढे गेलो," असं छगन भुजबळ म्हणाले.


तुम्ही 75 वर्षांचे आहात म्हणत प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले...


शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. तुमचं पण वय 75 आहे. शरद पवारांना विश्रांताचा सल्ला दिला आहे. तुमची पण ही शेवटची निवडणूक असणार का? याच्या पुढे निवडणूक लढणार का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भुजबळ यांनी, "म्हणूनच मी प्रांताध्यक्ष पद सुद्धा स्वीकारलेलं नाही. 1999 साली मला प्रांताध्यक्ष केलं होतं. तेव्हा मी त्या पदावर चार महिने राहिलो. प्रांताध्यक्ष, अध्यक्ष यांची काम मोठी आहेत. देशभर फिरायचं, राज्यभर फिरायचं, संघटना बांधायची. बाकी मंत्र्यांची इतर जी कामं असतात. बोलवलं तर जायचं काही ठिकाणी भाषणं करायची. मी हे करतोय. तिथे सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना म्हणजे पवारसाहेबांबरोबर असताना एक प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो. यापुढे सुद्धा अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाने सांगितलं भुजबळ तुम्ही थांबा तर थांबेन," असं उत्तर दिलं.


 


नक्की वाचा >> काका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत


 


"...तर आपल्या पक्षाबद्दल, नेत्याबद्दल राग येणं स्वाभाविक"


"पवारांनी काही निर्णय घेतले. 2004 ला आमदार जास्त असून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही. 2014 पासून भाजपाबरोबर चर्चा सुरु ठेवली. पुन्हा ते मागे हटायचे आणि त्यामुळे युती झाली नाही. पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या चुकांचा पाढा कालच्या तुमच्या बैठकीत वाचण्यात आला. नेतृत्व म्हणून शरद पवार कुठेतरी चुकलेले आहेत, असं आपल्याला म्हणायचं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, "काल अजितदादांनी ते म्हटलेलं आहे. एकतर तुम्ही त्या वाटेला जायचेचं नाही. एकदा गेला, दोनदा गेला, तिनदा गेला चार ते पाच वेळा असं झालं. सहाजिक आहे आपण एखाद्याला शब्द देऊन एकदा फिरवला ठिक आहे, दोनदा फिरवा असं सातत्याने आपण शब्द फिरवत गेलो तर त्यांच्या मनात आपल्या पक्षाबद्दल, नेत्याबद्दल राग येणं स्वाभाविक आहे. त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला पहायला मिळाल्या. एकतर चर्चा करु नका. जे काय व्हायचं ते होईल. पण तुम्ही चर्चा करता मागे येता. चर्चा करता मागे येता हे काही योग्य नाही. याचा पाढा काल अजितदादांनी वाचला," असं भुजबळ यांनी सांगितलं.