Ajit Pawar: `होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल`, अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar On CM Post: 2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी सुचक वक्तव्य केलं. 2024 ला कशासाठी? आताच करणार, असं म्हणत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Maharastra Politics: गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी रोखठोक वक्तव्य केलं आहे. राज्याच्या आगामी राजकारणावर अजित पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले Ajit Pawar?
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं अजिबात आकर्षण नाही. 2004 ला मुख्यमंत्रीपद मिळेल, एवढे आमदार निवडून आलेले होते. परंतू राजकारणात काही निर्णय घेतले जातात. काँग्रेसनेही त्यावेळी मानसिकता केलेली होती. परंतु दिल्लीत काय घडलं माहिती नाही. विधिमंडळाचा नेता म्हणून आर. आर. पाटील यांची निवड केली होती. त्यामुळं मुख्यंमत्रीपद जर राष्ट्रवादीनं घेतलं असतं तर त्यावेळी ते मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी सुचक वक्तव्य केलं. 2024 ला कशासाठी? आताच करणार, असं म्हणत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर होय मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेससोबत मोठ्या कालावधीसाठी सत्तेत राहिली पण अद्याप त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकलेली नाही, अशीच सर्वांची धारणा आहे, असं म्हणत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका करण्याची संधी सोडली नाही.
सर्वाधिक आमदारांचा मला पाठिंबा होता, त्यामुळे मी उपमुख्यमंत्री झालो. मी कधीच दादागिरीची भाषा करत नाही, मला ती भाषा वापरण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, असं म्हणताच एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. माझ्यात अजूनही मस्ती जिरवण्याची ताकद आहे, असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांना अनुभव येईपर्यंत त्याचं पद जाईल, असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.