Ajit Pawar : `नाईलाजानं मला...`, दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!
Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.
Ajit Pawar infected with Dengue : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना डेंग्यू (Dengue) झाल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पोस्ट करत याची माहिती दिली होती. त्यामुळे अजितदादा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) सक्रिय नसल्याचं पहायला मिळत होतं. अजित पवारांनी कार्यक्रम तुर्तास तरी पुढे ढकलले असून दिवाळीमध्ये स्नेहमिलनानिमित्त कोणाचीही भेट घेणार नाही, असा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घेतला आहे. अजित पवार यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बारामतीत पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती देखील समोर आली होती.
काय म्हणाले Ajit Pawar ?
गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी (Ajit Pawar infected with Dengue) असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.
पाहा ट्विट
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्याचबरोबर कुटूंबात देखील वाद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. काहीही झालं तरी पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जातोय. याआधी काही कार्यक्रमात दोघांनी उपस्थिती लावली होती. मात्र, दोघांनी देखील एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं होतं. त्यामुळे यांच्यातील कलह वाढल्याचं चित्र स्पष्ट झालं होतं.