शाळा आणि जम्बो कोविड सेंटरबाबत अजित पवार यांचा मोठा निर्णय
Ajit Pawars on school and Jumbo Covid Center : सध्या राज्यात शाळा सुरु झालेल्या आहेत. पुण्यातही कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे पाहून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्ण दिवस सुरु करणार आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पुणे : Ajit Pawars on school and Jumbo Covid Center : सध्या राज्यात शाळा सुरु झालेल्या आहेत. पुण्यातही कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे पाहून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्ण दिवस सुरु करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. आज त्यांनी पुण्यातील कोरोना स्थितीची आढावा घेतला.
जगात कोरोना संसर्गात कमी झालेली आहे. मात्र दैनंदिन मृत्यू मध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 90 हजार रुग्ण होते. या आठवड्यात 45 हजार वर आली आहे. म्हणजे 50 तक्केची घट आहे.15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी जेवढ्या प्रमानात लस उपलब्ध पाहिजे तेव्हढ्या प्रमाणत उपलब्ध नाही. पुण्यातील जंबो कोविड हॉस्पिटल 28 फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवणार. त्यांनतर परिस्थिती बघून निर्णय घेऊ, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
पुरावे द्या, कारवाई करतो - अजितदादा
जिल्ह्यातील विविध प्रकारच्या स्पर्धांना राज्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार परवानगी देणार आहोत. त्याचवेळी पुणे, पिंपरी चिंचवड च्या जम्बो कोविड सेंटरच्या कामात पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासादर संजय राऊत यांच्या संदर्भाने जे आरोप केलेत, त्याबाबत पुरावे दिले तर त्यात अर्थ आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावे द्या, चौकशी करुन सिद्ध झालं तर कारवाई करणार, असे थेट प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांना दिले.
'सुरक्षेबाबत त्रुटी राहिल्याने इमारत दुर्घटना'
येरवड्यात इमारत बांधकाम साईटवर अपघात झाला. सुरक्षेबाबत त्रुटी राहिल्याने ही घटना घडली. त्याठिकाणी बिहारमधील मजूर काम करत होते. त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला. 4 जण जखमी आहेत. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत दिली जाईल. जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करेल. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मार्फत तांत्रिक अहवाल तयार केला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
TET पेपर फुटी प्रकरणात योग्य पद्धतीने तपास
TET पेपर फुटी प्रकरणात पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत. एखाद्या प्रकरणात विशिष्ट गोष्ट समजावून घेण्याचा अधिकार मुख्य सचिवांना आहे. तसेच मला अशी गोष्टीत रस नाही. रोज नुसते आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. नंतर माफी मागितली जाते. हे काही बरोबर नाही, असे सांगत बंडातात्या कराडकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.