जळगाव : जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत साहेबराव पाटलांनी अमळनेर येथे बाजार समितीच्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. 


२००९ च्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील अमळनेर मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून जाणं पसंत केलं. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. 


नेहमी पवारांचे गुणगान गाणारे साहेबराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अमळनेर बाजार समितीच्या कार्यक्रमाला तीन कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थिती लावलेली असताना जिल्ह्यातले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मात्र पाठ फिरवली.