जयेश जागडे, झी 24 तास, अकोला : झोका कुणाला आवडत नाही. झोक्यावर बसण्याची इच्छा प्रत्येक मुलीची असते. मात्र झोका घेता घेता काळ आणि वेळ एकसाथ येईल याची कल्पना तरुणीला नव्हती. एक झोका काळजाचा ठोका चुकवणारा होता नव्हे तो जीवावरच बेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथे एका 21 वर्षीय तरुणीचा घरी झोका घेत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झोका घेत असताना दोरीचा गळफास लागून तिचा मृत्यू झाला. झोक्यावर बसण्याची तिची इच्छा एवढी घातक ठरेल असा नुसता विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. 



झोक्याच्या दोरीचा गाळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याणी पोटे असे या मृत तरुणीचे नाव असून ती डी एड चे शिक्षण घेत होती. कल्याणी घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती पाळण्याच्या दोरीवरील उशी सरकल्याने ती खाली कोसळून बेडच्या काठावर पडली आणि दोरी तिच्या गळ्याभोवती अडकेली.


काही वेळानंतर तिची आई आली तीने हा सर्व प्रकार पाहिला, या तरुणीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं.