Girl Attempts Suicide: महाराष्ट्रासह देशभरात महिलांची छेडछाड, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 'या घटनांतील आरोपींना कठोर शिक्षा करावी, जेणेकरुन भविष्यात कोणी अशी कृत्य करण्यास धजावणार नाही' अशी मागणी होतेय. दरम्यान शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईलमध्ये 'पॅनिक बटण' देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असे असले तरी मोठ्या शहरांसोबतच गावखेड्यातून अशा अनेक घटना समोर येत आहेत. अकोल्यातूनदेखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 


'संबंध ठेव नाहीतर फोटो व्हायरल करेन'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या सोबत संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करणार', अशी धमकी एका तरुणीला दिली जात होती. तरुणाच्या या रोजच्या जाचाला कंटाळून मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हा प्रकार समोर आलाय. पीडित तरुणी ही मूर्तिजापूर येथे शिक्षण घेण्यासाठी यायची. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पण तरुणाच्या त्रासाला कंटाळल्याने तिच्यावर जीव देण्याची वेळ आली आहे.  


पोलिसांकडे नोंदवला जबाब 


तरुणीने विष प्राशन केल्याची वार्ता कळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. तात्काळ उपचारासाठी मुलीला मुर्तीजापुर येथे दाखल करण्यात आले होते. येथे तिने आपला जबाब पोलिसांत नोंदवला होता. यानंतर तिला अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


आरोपींवर गुन्हे दखल करण्याची मागणी


पोलिसांना दिलेल्या जबाबत तिने आरोपी मुलगा माझा नेहमी मानसिक छळ करायचा असा आरोप केला होता. असे असले तरी स्थानिक पोलिसांनी अद्यापही याप्रारकणात चौकशी करून गुन्हे दखल केले नाहीत, असा गंभीर प्रकार समोर आलाय. त्यामुळे मुलीला न्याय मिळावा अशी मागणी वडिलांनी केली आहे.


नातीच्या वयाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग 


चॉकलेटचे आमिष दाखवून 2 वृद्धांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये हा प्रकार समोर आलाय. 2 वृद्धांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे यातील दोन्ही आरोपी साठीच्या पार आहेत. एका आरोपीचे वय साठ वर्षे आहे तर दुसऱ्या आरोपीचे वय 80 वर्षे आहे.यांनी अवघ्या अकरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला. इतक्या म्हातार वयात आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत असा प्रकार करताना त्यांच्या मनात काहीच दयामायेचा विचार आला नसेल का? असा प्रश्न विचारला जातोय. निळू बळीराम माने या 60 वर्षीय आणि आगतराव मुळे या 80 वर्षीय वृद्धांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वृद्धांनी पीडित मुलीला चॉकलेट आणि पैशाचे अमिष दाखवले. यानंतर त्यांनी अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी हा प्रकार घडला होता.