जयेश जगड, झी मीडिया, अकोला :  अकोला जिल्ह्यातील व्याळा इथल्या मानव पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणारे तिन तरुण आणि एक तरुणी गेल्या एक ऑगस्ट पासून बेपत्ता आहेय..एक ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले. मात्र तेव्हापासून ते परतलेच नाहीय, त्यामुळे त्यांची मिसिंग कंपलेंट बाळापूर आणि सिव्हील लाईन पोलिसात देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं प्रकरण काय आहे?
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे चारही जण नापास झाले होते, त्यामुळे नैराश्यातून त्यांनी घर सोडलं आहे. शिक्षणात पुढे कसं जावं या विवंचनेतून हे चारही विद्यार्थी गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता आहेय, त्यांचे पालक आता त्यांना परत घरी येण्यासाठी विनंती करीत आहेय..


यामधील एक तरुणीचे चार विषय राहिल होते. तर इतर तीन विद्यार्थ्यांही काही विषयात नापास झाल्याची माहिती आहे. हे चौघेही कॉलेज मधून सोबत गेल्याच कॉलेज प्रशासनाने म्हंटलंय. 


दरम्यान, चौघांच्या बेपत्ता होण्यामागे नापास झाल्याचं कारण नसून वेगळंच कारण असावं असा अंदाज कॉलेजच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. ही चारही मुलं कॉलेज मध्ये गेली होती, निकाल ऑनलाइन असल्यामुळे ती नेमकी कॉलेज मध्ये का आली होती ते माहीत नसून तीन आणि चार वाजताच्या सुमारास हे चौघेही कॉलेज मधून निघून गेले होते, हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये असल्याचं कॉलेज संचालकांनी म्हंटलंय


नेमकं प्रकरण काय याचा तपास पोलीस तर घेतच आहे, तर पालकांनी मुलांना घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. चारही विद्यार्थी स्वतःहून बेपत्ता झाले आहे किंवा त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे याचा तपास पोलीस करत आहेय.