अकोला : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना आपल्या जन्मगावात पराभवाचा सामना करावा लागलाय.


कुणात झाली लढत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्रामपंचायतीमध्ये डॉ. रणजित पाटील पॅनलचा पराभव झालाय. घुंगशी हे डॉ. रणजित पाटलांचं जन्मगाव आहे. ग्रामपंचायतीत पाटील गटाविरूद्ध काटे-देशमुख पॅनल अशी लढत झालीय. या निवडणुकीत सरपंचपदासह सातही जागांवर काटे-देशमुख गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेत. 


सरपंचपदी कोण?


सरपंचपदी जयश्री काटे २१० मतांनी विजयी झाल्यात. त्यांनी डॉ. रणजित पाटील यांच्या चुलत काकू स्वाती पवित्रकार यांचा पराभव केलाय. घुंगशी ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर एक अपवाद वगळता कायम पाटील कुटूंबियांची सत्ता होती.