COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयेश जगड, झी २४ तास, अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या एका व्हिडीओनं समाजाचं एक असंवेदनशील रूप समोर आलंय. कांद्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटणं अकोटच्या रितीक कहार या या कांदा व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. ट्रकचा चालक टायर दुरूस्तीसाठी बाहेर गेल्याचं पाहून लोकांनी चक्क कांदे लूटण्यासाठी झुंबड केलीय. तर काहींनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला.


व्हिडीओ काढला जात असल्याचं पाहून काहींनी भीतीने कांदे टाकूनही दिले. या ट्रकमध्ये कांद्याचे २७५ कट्टे होतेय. अकोट- दर्यापूर मार्गावरील ढगा फाटा ते सावरा दरम्यान काल दुपारी हा प्रकार घडलाय. 


दरम्यान या सर्व चोरीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यानंतर लगतच्या सावरा, मंचनपूर, आसेगाव या गावांतून १६० वर कांद्याचे पोते व्यापाऱ्याला परत करण्यात आले. या प्रकरणात कोणतीही पोलीस तक्रार झाली नाही.