Akola Ladaki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरु आहे. लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना देखील आणली. दरम्यान अकोल्यात एक वेगळा प्रकार समोर आलाय. लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांनी अर्ज भरल्याचे तपासात आढळून आले आहे. या गंभीर प्रकारानंतर आता एकच खळबळजनक उडालीय. कसा समोर आला प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहेय. राज्य सरकार मोठ्या प्रमाणात या योजनेची जाहीरात करतंय. तर बॅंक खात्यात 1500 रुपये येत असल्याने महिलादेखील आनंदी आहेत. सध्या अकोला जिल्यातील 4 लाख 35 हजार 238 महिलांनी लाडकी बहीण योजनेबाबत ऑनलाइन तसेच ऑफलाईन फॉर्म भरले आहेत.यापैकी 4 लाख 26 हजार 240 फॉर्म मंजूर झाले असून 6 हजार महिलांच्या फॉर्म मध्ये त्रुटी आढळली आहे.


6 युवकांनी भरला फॉर्म


अकोला जिल्यातील तब्बल 27 हजार महिलांचे आधार सीडिंग झाले नसल्याने महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही आहे.मात्र हे सर्व सुरू असतांना अकोला जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. अकोला शहरातील सहा युवकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.


पालिकेच्या तपासादरम्यान प्रकार उघडकीस


हे सहा युवक हे अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असून या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आलेय. महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान सदरचा हा प्रकार उघडकीस आला.


या सहा पुरुषांना आधार कार्ड द्वारे कोणतेही लाभ मिळणार नसल्याचं संबंधित विभागाने म्हंटलय. तसेच या युवकांकडून संबंधित प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.


लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात 


29 सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. त्याचदिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत आलेल अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. या योजनेमुळं 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. 


लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस?


लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस जवळ येत आहे. त्यामुळं ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेला नाहीये त्यांनी अर्ज करावात असं अवाहन सरकारकडून केलं जातं आहे.  30 सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महिलांचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर त्यानंतर तीन महिन्यांचे एकत्रित असे 4500 खात्यात जमा होणार आहेत.