Akshay Shinde Encounter Case: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊन्टरवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अनेक गंभीर आरोप करताना संजय राऊत यांनी संबंधित शाळेमध्ये इतरही गैरप्रकार सुरु असल्यासंदर्भात हायकोर्टामध्ये अन्य एक याचिका दाखल करण्यात आल्याचा उल्लेख प्रसारमाध्यमांशी बोलातना केला आहे. तसेच अक्षय शिंदेंचा एन्काऊन्टरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरु असलेल्या श्रेयवादाचा संदर्भ देत हा राजकीय स्वार्थासाठी एन्काऊन्टर घडवल्याचं राऊत म्हणालेत. बदलापूरमधील त्या शाळेचा संबंध भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. 


"कसला बदला पूर्ण झाला?"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाराष्ट्रात अनेक महिलांवर बलात्कार आणि अत्याचार झाले. एकनाथ शिंदेंच्या ठाणे मतदारसंघात आणि फडणवीसांच्या मतदारसंघातील ही आकडेवारी मी तुम्हाला देऊ शकतो. त्यापैकी किती बलात्काऱ्यांचे एन्काऊन्टर आपण करणार आहात? तुम्ही स्वत: सिंघम आहात ना? सिंघम स्वत: जाऊन गोळ्या घालतो. खाकी वर्दीतीला सुपारी देऊन गोळ्या घालून घेत नाही. त्याला कधी गोळ्या घालणार? समान न्यायाचा विचार केला तर सर्वांना एकच न्याय पाहिजे. बदलापूर प्रकरणात कसला बदला पूर्ण झाला?" असा सवाल राऊतांनी विचारला आहे.


"त्या सर्व आरोपींचे एन्काऊन्टर करा"


"या प्रकरणामागे एक रहस्य आहे. हे आता कोर्टात आलं आहे. एका व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. ज्या शिक्षण संस्थेत हे झालं आहे ते भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही हा एन्काऊन्टर केला आहे हे लोकांना काळलं आहे. मिस्टर सिंघम एक आणि दोन तुमच्या कार्यकाळात जेवढ्या बलात्काराच्या घटना घडल्या त्या सर्व आरोपींचे एन्काऊन्टर करा," असंही राऊत म्हणाले.


नक्की वाचा >> सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'


"त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस, चाइल्ड ट्रॅफिकींग..."


"तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे. दोन, तीन लोक असे आहेत त्यांच्यावर काही आरोप हायकोर्टातील याचिकेत झालेत. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेऊन पुरावा नष्ट केला. कारण या बलात्कार कांडामागील सूत्रधार, असा आरोप त्या याचिकेत आहे की त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस, चाइल्ड ट्रॅफिकींग, अशा काही घटना घडत होत्या असं त्या याचिकेत आहे. ती संस्था आणि त्या व्यक्ती भाजपा आणि संघाशी संबंधित होत्या. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही अक्षय शिंदेंचा एन्काऊन्टर झाला असं दाखवलं आहे," असा गंभीर आरोप राऊतांनी केला.