Badlapur Case Accused Akshay Shinde Shoots : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याला पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे देखील तर्क वितर्क लावले जात आहेत. अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या खासदाराने दिली आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी  केले आहे. आरोपी अक्षल शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. यासाठी  नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन केले यामुळे आरोपीला निसर्गानेच शिक्षा दिली आहे असं माझ वैयक्तिक मत असल्याचे नरेश मस्के म्हणाले.


दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदे याच्या मृत्यू बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सर्व प्रकरण संशयास्पद असून चौकशीची मागणी केली आहे. आरोपीला शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, अशा प्रकारे आरोपीचा मृत्यू होत असेल तर हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. नेमकं कायच घडलं हे सत्य समोर आले पाहिजे. आरोपीला नेत असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही का? आरोपीचे एन्काऊंटर झालंय का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहेत.