नवी दिल्ली : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात तुम्ही दुकानात जाऊन सोनं खरेदी करु शकत नाही. अशावेळी ऑनलाईन खरेदी हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. यामध्ये तुम्ही सोनं ऑनलाईन खरेदी करु शकता आणि लॉकडाऊन काळ संपल्यानंतर तुम्हाला ते मिळू शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे अक्षय तृतीयेचा शुभ मुहुर्तावर सोनं खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. ज्या सोनारांकडे ऑनलाईन सोने खरेदी करण्याची व्यवस्था नाहीए, अशा सोनारांना तोटा सहन करावा लागणार आहे.


असं खरेदी करा सोनं 


रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरी बसून सोनं खरेदी करु शकता. यासाठी फोन पे, पेटीएम, कल्याण ज्वेलर्स आणि तनिष्क सारखे ब्रांड सुविधा देत आहेत. याव्यतिरिक्त सरकारद्वारे सुरु असलेली सॉवरेन गोल्ड बॉंड स्कीम देखील आहे. सध्या सुरु असलेल्या काही योजनांबद्दल जाणून घेऊया...



तनिष्कची ऑफर 
तनिष्कची विशेष ऑफर १८ ते २७ एप्रिलपर्यंत सुरु असेल. तर २० जूनपर्यंत तुम्ही दुकानात जाऊ सोनं बदली करु शकता. यातील घडवणी शुल्कात २५ टक्के सूट देण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर जाऊन तुम्ही सोनं खरेदी करु शकता.


कल्याण ज्वेलर्स 


कल्याण ज्वेलर्सने गोल्ड ऑनरशिप सर्टिफिकेट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. अक्षय तृतीया किंवा त्याआधी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरुन हे खरेदी करु शकता. यामध्ये ग्राहक २ ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक सोनं खरेदी करु शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे सर्टीफिकेट ईमेल, व्हॉट्सएप किंवा इतर मार्गाने पाठवता येईल. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत यावरुन तुमही खरेदी करु शकता.


सरकारी योजना 


मोदी सरकार तुमच्यासाठी सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम घेऊन आली आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला एका आर्थिक वर्षात ५०० ग्रॅम सोन्याचा बॉण्ड खरेदी करता येऊ शकेल. यामध्ये १ ग्रॅम इतकी कमीत कमी गुंतवणूक असणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत २.५ टक्के वर्षीक व्याज मिळेल.


'फोन पे'वरुन खरेदी 


ग्राहक फोन पे एपच्या माध्यमातून घरबसल्या २४ कॅरेट गोल्ड लाईव्ह, पारदर्शी किंमतीवर खरेदी करु शकतात. फोन पे मधील मार्केटप्लेस या ऑप्शनवर जाऊन सेफ गोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपी इंडीया च्या मान्यताप्राप्त गोल्ड रिफायनरीसोबत भागीदारी सुरु आहे.