कैलास पुरी, झी मीडिया आळंदी: आषाढी वारीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वारीला सुरुवात होत असतानाच आता कोरोनानं शिरकाव केल्याची माहिती मिळाली आहे. माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या 100 वारकऱ्यांपैकी 2 जणांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती मिळताच काहीसं गोंधळाचं वातावरण झालं. इतकच नाही तर दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी 20 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 164 जणांचे रिपोर्ट आले असून 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्या माऊलीचं प्रस्थान दुपारी होण्याची शक्यता असतानाच आता वारकऱ्यांची चिंता वाढली आहे. 


विठुरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ वारक-यांनाच परवानगी देण्यात आली आहे.दुसरीकडे पैठणमधून संत एकनाथांची पालखी मार्गस्थ झाली आहे. मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान झालं आज मुक्काम समाधी मंदिरात करण्यात आला आहे.


आषाढी वारीच्या अनुषंगाने 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येणार आहे. नियम घालून मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माहिती दिली आहे.