औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुणे आणि मुंबईमधून आलेल्या आणि येणाऱ्या सर्व प्रवासाचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. चार ठिकाणी स्क्रीनिग सेंटर उभारण्यात येणार आहे. रात्री येणाऱ्या प्रवाशांचंही स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी याबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात ३६ जणांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यापैकी सात जण संशयित असून पाच जणांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सातही रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे सद्यपरिस्थितीत औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात आठ संशयित रुग्णांवर विलगीकरण म्हणजे आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, पुण्यात कॅरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत आणि त्याचाच फटका एसटी महामंडळाला बसला आहे. औरंगाबादेतून पुण्याला दर अर्ध्या तासाने बस जाते. मात्र, आज सकाळी ११ वा. २० प्रवासी घेऊन दर तासाला बसेस रद्द होत आहेत. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये जवळपास ९० टक्के घट झाली आहे. सगळ्या बस रिकाम्या आहेत. दिवसाला लाखो रुपयांचं नुकसान होतं आहे.