Diwali Mithai Price Hike  : यंदा कोरोना निर्बंध नसल्याने सर्वच सण-उत्सव उत्साहाने साजरे होत आहेत. काही दिवसांवर दिवाळी सण येत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. वस्तू खरेदीदरम्यान नागरिकांना महागाईचे चटके सोसावे लागत आहे. त्यातच आता दिवाळी तोंडावर आली असताना मिठाईच्या (Diwali Mithai Price Hike ) दरात अचानक वाढ झाली आहे. आतापर्यंत 120 रुपये प्रति पाव असलेले पेढे 140 रुपयांच्या घरात गेले आहेत. काजू कतली हजार रुपये किलोच्या आसपास पोहोचली आहे. एकूणच सर्व मिठाईचे दर किमान सहाशे रुपये प्रति किलो झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर, भाजीपाला, दूध दरवाढीनंतर आता मिठाई दरवाढपण सर्वसामान्यांना सोसावी लागणार आहे. यामध्ये दिवाळीत सर्वाधिक मागणी असलेल्या मिठाईच्या दरात वाढ सुरू झाली आहे.   त्याचवेळी साखरदेखील अचानक पाच रुपये प्रति किलोने वधारली आहे. त्याचा परिणाम झाला आहे.


त्याचवेळी बाहेरून येणाऱ्या खव्याची आवक घटली आहे. त्याचवेळी मागील आठवडाभरात मिठाई मागणीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेकांनी दिवाळीसाठी आगाऊ बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच दरवाढ झाली आहे.


वाचा : दुधाच्या दरांचा भडका उडणार? आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे


मुंबईत प्रामुख्याने कसारा व माळशेज, अहमदनगर या भागांतून मोठ्या प्रमाणात मावा मुंबईच्या बाजारात येत असतो.  गणेशोत्सव, दसरा, दिवाळी अशा उत्सवांच्या काळात या खव्याची आवक 60 ते 80 टक्क्यांनी वधारत असते. यंदा मात्र सद्यस्थितीत 30 टक्के अधिकच आवक होत आहे. त्यामुळे एकूणच मागणीच्या निम्माच मावा बाजारात उपलब्ध आहे. 


मिठाई तयार करण्यासाठी मावा व साखर सर्वाधिक लागतो. त्यातच साखर, दूध महाग व दुसरीकडे खव्याची कमी असलेली उपलब्धता, यामुळे यंदा मिठाईचे दर महाग होऊ लागले आहेत. प्रत्यक्ष दिवाळीदरम्यान मागणी वाढली की हे दर सध्यापेक्षा आणखी किमान 20 टक्के महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


प्रमुख मिठाईचे दर असे (प्रति पाव)


प्रकार मागील आठवड्यातील आत्ताचे


साधा पेढा 80 100-100


पिवळा पेढा 100 120 


मलाई पेढा 102 140 


कंदी पेढा 130 150 


मथुरा पेढा 150 180 


काजू कतली 220-230 260- 280 


बदाम कतली 200 240 


मिल्क केक 180 220


सुकामेवा बर्फी 225-230 250-270 


कलाकंद बर्फी 200 230