सैतान जागा झाला! आधी मेहुणीवर अत्याचार करून तिची केली हत्या, नंतर संपवले कुटुंबीयांना
नागपूर येथे हत्यासत्र सुरुच आहे. पत्नी, दोन मुलांसह मेव्हणी आणि सासूची हत्या करणाऱ्या निर्दयी आलोक माटूरकर (Alok Maturkar) याने केलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादाय माहिती पुढे येत आहे.
नागपूर : येथे हत्यासत्र सुरुच आहे. (Nagpur murder) कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी एका तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, त्याआधी पत्नी, दोन मुलांसह मेव्हणी आणि सासूची हत्या करणाऱ्या निर्दयी आलोक माटूरकर (Alok Maturkar) याच्यातील सैतान जागा झाला. त्याने केलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादाय माहिती पुढे येत आहे.
धक्कादायक कृत्य
रविवार रात्री आलोक माटूरकर याने धक्कादायक कृत्य केले. त्याच्या निरागस चेहऱ्यामागील क्रुरचेहरा पुढे आला आहे. आधी त्याने मेव्हणीवर अत्याचार केले.त्यानंतर तिची हत्या केली. त्यानंतर त्याने सासू आणि घरी जावून पत्नी आणि आपल्या मुलांची हत्या केली. आलोक हे हत्याकांड करण्यापूर्वी ऑनलाईन चाकू खरेदी केला होता. काही वेबसाईटच्या माध्यमातून महिला वशीकरणची माहिती हा नराधम काढत असल्याची माहितीही पुढे येत आहे.
चाकूने हल्ला करत तिचा गळा चिरला
पत्नी आणि मुलांसह पाच जणांची हत्या करणारा नराधम अलोक माटूरकर विकृत मनोवृत्तीचा होता. स्त्रीलंपट होता. मारेकरी आलोकने रविवारी रात्री अगोदर आपल्या मेहुणीची म्हणजेच अमिषा हिची हत्या केली. तिची हत्या करण्यापूर्वी अगोदर जबदस्तीने त्याने संबंध ठेवले. त्यानंतर अमिषावर चाकूने हल्ला करत तिचा गळा चिरला आणि छातीवर चाकूने अनेक वार करत तिची हत्या केली.
पोटच्या मुलांचाही गळा घोटला
दरम्यान, यावेळी अमिषाची आई लक्ष्मीबाई आलोकच्या घरी आपल्यामोठ्या मुलीकडे गेलेली होती. लक्ष्मीबाई अचानक घरी पोहोचल्या आणि आधीच सैतान स्वार असलेल्या आलोकने त्यांचीही गळा चिरून हत्या केली. तिथून आपल्या घरी परतलेल्या आलोकने आधी पत्नी विजयाला गळा चिरून ठार केले. त्यावेळी मुलगी जागी झाल्यामुळे आणि तिने हा प्रकार पाहिला आणि सैतानी बापाला विरोध केला. त्यावेळी बापाने मुलीच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून तिची हत्या केली. सर्वात शेवटी आलोकने झोपलेल्या लहान मुलाचे उशीने तोंड दाबून हत्या केली. त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवल्यानंतर आपली आता पोलिसांपासून सुटका होणार नाही, हे लक्षात येताच त्याने सकाळच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली, असावी अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
धक्कादायक बाब पुढे
या प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. आलोक याने हत्याकांड घडविण्याआधी दोन दिवसांपूर्वीच त्याने ऑनलाईन चाकूचा सेट खरेदी केला. एवढेच नाही तर विकृत आलोक काही वेबसाईटच्या माध्यमातून महिला वशीकरणची माहिती ही काढत होता. मात्र ही माहिती तो मेहुणी हिला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी गोळा करत होता का, हे स्पष्ट नाही. शिवाय त्याला पोर्न फिल्म पाहण्याचे व्यसन होते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, मृत्यूपूर्वी अमिषाने ऑडिओ रेकॉर्डिंग अॅप सुरु केले होते. यामध्ये घटनाक्रम रेकॉर्डिंग झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अलोकच्या क्रुरकर्मामुळं संपूर्ण नागपूर हादरले आहे.