पुणे : माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि कितीही मोठा झाला तरी त्याचा त्याच्या शाळा - कॉलेजशी असलेला ऋणानुबंध तुटत नाही. पुढे एखाद्या निमित्तानं जुने सवंगडी भेटतात आणि जुन्या आठवणींना आपसूक उजाळा मिळतो. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये त्याचा अनुभव आला. 


वाडिया कॉलेजला यंदा ८५ वर्ष पूर्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाडिया कॉलेजला यंदा ८५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमत्तानं वाडियन्स अॅल्युम्नि असोसिएशनतर्फे कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
चेतन चौहान हे वाडियाचे माजी विद्यार्थी



भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे आणि चेतन चौहान हे वाडियाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते कॉलेज जीवनातील आठवणींमध्ये रमून गेले. 


कॉलेज जीवनातील आठवणींमध्ये रमून गेले


वाडिया कॉलेजनं केवळ आपल्यातील क्रिकेटर घडवला नाही. तर जगण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास दिला. अशा शब्दांत त्यांनी वाडिया कॉलेजप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर, कॉलेजचे प्राचार्य के. एस. वेंकटराघवन हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.