पुणे : Amarnath Yatra News Update:  दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाली. अमरनाथमध्ये गुहेजवळ झालेल्या ढगफुटीतील मृतांची संख्या 15वर गेली आहे. अजूनही 40 भाविक बेपत्ता आहेत. या दुर्घनेत महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे. पुणेमधील एका दाम्पत्याचा समावेश आहे, अशी माहिती मिळत आहे. तसेच नाशिकमधील काही भाविकही अमरनाथ यात्रेला गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरनाथमध्ये काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अमरनाथच्या गुहेपासून 2 किमी अंतरावर ही ढगफुटी झाली. यामुळे भाविकांचे तंबू वाहून गेले. घटनास्थळी NDRF आणि SDRFचं पथक दाखल झालं असून बचावकार्य सुरु झाले आहे.  ढगफुटीमुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ढगफुटीमुळे भाविकांचे जवळपास 25 तंबू वाहून गेले आहेत. अनेक भाविक या भागात अडकून पडले असून यात नाशिकच्याही भाविकांचा समावेश आहे.


पुण्यातील महेश भोसले आणि सुनीता महेश भोसले हे दाम्पत्य हे परवा अमरनाथ यात्रेसाठी गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आता या दोघांचाही संपर्क होत नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.