Ambernath Hit And Run प्रकरणात भलताच ट्विस्ट; लेकानेच बापाच्या कारचा पाठलाग करत अपघात घडवला
Ambernath Man Hit Car With His SUV: अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिट अँड रन प्रकरणात एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.
Ambernath Man Hit Car With His SUV: अंबरनाथमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, घरातीलच व्यक्तीने हा अपघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण - बदलापूर रस्त्यावरील चिखलोली नाक्याच्या जवळ हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या दृश्यांमध्येमध्ये एका काळ्या रंगाच्या कारचा चालक समोर उभ्या असलेल्या सफेद रंगाच्या कारला धडक देतो. यामध्ये तो सफेद रंगाच्या चार चाकी गाडीचा चालक अक्षरशः थोडक्यात बचावतो.
सुरुवातीला हा अपघात असल्याचे जाणवते. मात्र, दुसऱ्याच सेकंदाला पुन्हा काळ्या रंगाची कार सफेद कारला धडक देते. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारच्या मागे उभी असलेली दुचाकीवर धडकली गेली. त्यात दुचाकीस्वार हा अक्षरशः चिरडले गेले आहेत. या घटनेत दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहेत. तर, याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबरनाथ हिट अँड रन केसचा हा प्रकार आधीच्या भांडणातून झाला असल्याचं बोलले जातं आहे. बाप-लेकाच्या भांडणातून या प्रकार घडला आहे. कौटुंबिक वादातूनच मुलाने वडिलांचा अपघात करण्याचा प्रयत्न केला आहे. बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडील बिंदेश्वर शर्मा हे आपल्या वाहनाने सतीशची पत्नी, नातू आणि इतर कुटुंबातील सदस्यांसोबत कुलाबा येथील आपल्या निवासस्थानी घेऊन जात होते. त्याचवेळी पत्नी व वडिलांसोबत झालेल्या वादातून सतीशने वडिलांच्या कारचा पाठलाग करत अपघात करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या अपघातात कारच्या मागे असलेले दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.