अमेरिकेतील उद्योजक लोकसारंग हरदास यांचा मदतीचा हात, माजी विद्यार्थ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची मदत
भविष्यात विद्यार्थ्यामधून उद्योजक घडावेत आणि त्यांच्यातस्टार्टअप व्हीजन निर्माण व्हावे यासाठी ‘इन्क्युबेशन सेंटर’ सुरु करण्यात आले आहे
नागपूर : लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एलआयटीच्या ‘इन्क्युबेशन सेंटर’ मध्ये पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी एका माजी विद्यार्थ्यांने तब्बल दीड कोटी रुपये दिले आहे.एलआयटीचे माजी विद्यार्थी आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेलेल उद्योजक लोकसारंग हरदास यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे.
भविष्यात विद्यार्थ्यामधून उद्योजक घडावेत आणि त्यांच्यातस्टार्टअप व्हीजन निर्माण व्हावे यासाठी ‘इन्क्युबेशन सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. त्याकरता एलआयटीतीलच एका माजी विद्यार्थ्यानं दीड कोटींची केलेली ही मदत नक्कीच नवीन आदर्श निर्माण करणारी आहे.
एलआयटीमध्ये सुरू करण्यात आलेले इन्क्युबेशन सेंटर ही अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात उपयुक्त ठरणार आहे. अनेक विद्यार्थ्यामध्ये स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा असते मात्र त्यांना योग्य दिशा वा मार्गदर्शन मिळत नाही.
अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी म्हणून एलीआयटीच्या माजी विद्यार्थी संघटना लिटाने इन्क्युबेशन सेंटर मध्ये स्टार्टअप कट्टा सुरु करण्याचं ठरवलं.
त्याअंतर्गत ‘एलआयटी स्टार्टअप कट्टा’चे उद्घाटनप्रसंगी एलए’ज टोटली ऑसमचे संस्थापक व सीईओ असलेल्या लोकसारंग हरदास यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं मदतीचा हात म्हणून दीड कोटी रुपये एलआयटी संस्थेला दिलेत.
‘स्टार्टअप कट्टा’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यश प्राप्त करणा-या व्यक्तींशी संवाद साधता येईल व त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा घेता येईल, असा विश्वासही लोकसारंग हरदास यांनी व्यक्त केला.
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि लिटा (एलआयटी अलम्नी असोसिएशन)च्या वतीने शुक्रवारी एलआयटी इन्क्युबेशन सेंटरच्या ‘एलआयटी स्टार्टअप कट्टा’चे उद्घाटन करताना ते बोलत होते. केमिकल इंजिनियरींग ऑडिटोरियममध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिटाचे अध्यक्ष माधव लाभे होते.
एलआयटी संचालक डॉ. राजू मानकर, लिटाचे सचिव उत्कर्ष खोपकर, इन्क्युबेशन सेंटर प्रोजेक्ट संचालक विनोद कालकोटवार, सह-संचालक सचिन पळसोकर, पूर्व अध्यक्ष अजय देशपांडे, लिटा युथ फोरमचे मिली जुनेजा व चिन्मय गारवे, तसेच, मालपानी ग्रुपचे राजेश मालपानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपुरात मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या लोकसारंग हरदास यांनी अमेरिकेपर्यंतचा प्रवास उलगडला. एलआयटीमधील विद्यार्थी जीवन, येथील पहिला संप अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले.
आयुष्यात आलेल्या प्रत्येक अनुभवातून शिकत गेलो, असे सांगताना हरदास यांनी आयुष्यात जर काही साध्य करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वत:ला मर्यादा घालू नये, चुकांतून शिकत जावे, प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा, भरपूर व प्रामाणिक मेहनत करावी अशा अनेक टीप्स दिल्या.