मुंबई : 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' असं आपण अनेकदा वाचतो, शक्य त्या प्रसंगी हे ब्रीदवाक्य आचरणातही आणतो. अशा या वाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारी एक व्यक्ती लॉक़डाऊनच्या या काळात साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षात असूनही जनसेवेचं कार्य अविरतपणे करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे करनैल सिंह खैंरा. महाराष्ट्रातील एका अतिशय दूरगामी भागातील महामार्गावर ते भुकेलेल्यांना लंगलॉर खाऊ घालतात. मुख्य म्हणजे त्या महामार्गाच्या भागात खाण्याची सोय म्हणून हा लंगरच अनेकांची भूक भागवण्यास सज्ज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय महामार्ग ७ वर असणाऱ्या करणजी क्रॉसच्या पुढे गेलं असता 'गुरु का लंगर' नजरी पडतो. इथे येणाऱ्या प्रत्येकालाच मोफत जेवणाची सुविधा पुरवली जाते. ज्या ठिकाणी हा लंगर चालतो तेथून जवळपास ३०० किमी अंतरापर्यंत कोणताही ढाबा किंवा खाण्याची सोय असणारं एकही दुकान नाही. त्यामुळं प्रवाशांपासून ते अगदी ट्रक चालकांपर्यंत चर्वचजणांना लंगरमध्ये खाण्याचाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. 'गुरु का लंगर' म्हणूनही हा लंगर ओळखला जातो. 


लॉकडाऊनमध्येही सुरुच राहिला 'गुरु का लंगर'


देशभरात कोरोना व्हायरसचा थैमान सुरु असतानाच अनेक सेवा ठप्प झाल्या. पण, हा लंगर मात्र त्याची सेवा अविरतपणे देत राहिला. करनैल सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी इथे येणाऱ्या प्रत्येका भुकेलेल्याची भूक भागवली. प्रवासी, मजूर, ट्रक चालक, अनेक गावकरी या साऱ्यांना या लंगरमध्ये जेवण देण्यात आलं. मुख्य म्हणजे लंगरच्या या सेवेत भूक भागवण्यासाठी येणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी सेवाही दिली. त्यामुळं माणुसकीच्या एका वेगळ्या आणि तितक्याच निस्वार्थ रुपाचं दर्शन येथे घेता आलं. 


 


यामागे आहे रंजक इतिहास.... 


या ठिकाणहून जवळपास ११ किमी अंतरावर वनक्षेत्रात बागोर साहिब गुरुद्वारा आहे. शीख धर्मियांसाछी हा एक अतिशय महत्त्वाचा गुरुद्वारा समजला जातो. ज्यावेळी शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग नांदेडसाठी जात होते तेव्हा ते याच ठिकाणी थांबल्याचं सांगितलं जातं. करनैल सिंग यांनी सांगितलेल्या माहितीनुसा नवभारत टाईम्सनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'बागोर साहेब गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून बराच दूर आहे. त्यामुळं १९८८ मध्ये महामार्गावर हे लंगर सुरु करण्यात आलं. बाबा नरेंद्र सिंग आणि बाबा बलवींदर सिंग यांनी मला या ठिकाणई सेवा करण्याची संधी दिली', असं करनैल सिंग सांगतात.