Amit Thackeray :  मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत.  महासंपर्क अभियानासाठी  अमित ठाकरे दोन दिवस शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत.  कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास अमित ठाकरे यांची वाट पाहिली. मात्र. ते फक्त 20 सेकंद तांबले. अमित ठाकरे यांच्या कृतीमुळे मनसे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्ते राजीनामा देणार असल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिशिंगणापूर इथे शनीला तैलाभिषेक केला. अमित ठाकरे मनसेला उभारी देण्यासाठी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे.  शनिशिंगणापूर दर्शन घेतल्यावर रात्री उशीरा अमित ठाकरे शिर्डीत दाखल झाले. 


चार तास वाट बघून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कारण, अमित ठाकरे राहाता शहरात केवळ 20 सेकंद थांबल्याने कार्यकर्ते नाराज झाले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. यामुळे मनसे महासंपर्क अभियान पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकी अगोदर मोठी नाराजी पसरली आहे.


मनसेच्या नामफलकाचे अनावरण न करताच अमित ठाकरे शिर्डीकडे रवाना झाले. उद्विग्न झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने नामफलकाचा कव्हर फाडला. राजीनामे देणार असल्याची भावना  पदाधिकाऱ्याने व्यक्त केल्या आहेत.


अमित ठाकरे यांनी अहमदनगर येथे विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील शासकीय विश्रामगृहात अमित ठाकरेंनी शहरातील विद्यार्थ्यांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मनविसेच्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी 35 विधानसभा मतदारसंघात 7 हजार विद्यार्थ्यांशी आतापर्यंत संवाद साधलाय. 


संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत


उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच संजय राऊत घेणार आहे. सामना या मुखपत्रासाठी ही मुलाखत होईल आणि सर्वत्र प्रसिद्ध केली जाईल. राष्ट्रवादीतली फूट, अजित पवारांचा शपथविधी, महाविकास आघाडीचं भवितव्य, राज्यातली बदललेली राजकीय स्थिती, काँग्रेससोबत इंडिया आघाडीत सहभागी होणं, आगामी निवडणुकांची रणनीती यावर उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत. उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. 


आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा


येवल्यातील पदाधिकारी मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री हे सतत 2 दिवसांनी दिल्लीला जातात. महाराष्ट्राला तोडण्याचं राजकारण सुरू असून, महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि अलिबाबा महाराष्ट्राला लुटतायत अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर केली.