Amit Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मनसेने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. कालच (22 ऑक्टोंबर) रोजी राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर आज मनसेकडून ही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारी मिळाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


लीस्टमध्ये माझ नाव आलं तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता. कारण मला समजलं की आता माझं आयुष्यात बदल होणार आहे. जस मी आधी वावरायचो आता तस वावरता येणार नाहीये. शासकीय पदाचे ओझ इतकं असतं की पण मी ते घ्याला तयार आहे. मला उमेदवारी मिळेल असं मला वाटलं नव्हत. मुंबईतील माहीम मतदारसंघात बिग फाईट होणार. निवडणूक लढण्याचा आत्मविश्वास आहे. दादरमध्ये मी लहानाचा मोठा झालोय, आमच्या इथं तीन पिढ्या राहिल्या आहेत. दोन्ही उमेदवार समोर असतील, त्यांना माझ्या शुभेच्छा. असं अमित ठाकरे म्हणाले. 


माझ्यासाठी तडजोड नको, विरोधात असणाऱ्यांना शुभेच्छा 


राजकारणात समोरचे लोक कसे आहेत हे ओळखायला पाहिजे, असं राज ठाकरे नेहमी म्हणतात. कुणी परतफेड करावी, अशी आमची इच्छा नाही. त्यांनी राजकारण करावं. त्यामुळे माझ्यासाठी कुठेही तडजोड करु नका, विरोधात जो उभा असेल त्यांना माझ्या शुभेच्छा, असं राज ठाकरेंना मी सांगितलं आहे. असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. 


दादर, माहीममध्ये अनेक समस्या


मी दादर, माहीमच्या लोकांचे प्रश्न जाणतो. गेल्या काही दिवसांपासून लोक मला तेथील समस्या सांगत आहेत. मला सर्व प्रथम माहीम आणि दादरच्या समुद्रकिनारा स्वच्छ करायचा आहे. शेजारी भावाच्या मतदारसंघात दादरचा अर्धा  समुद्रकिनारा असला तरी देखील तो मी स्वच्छ करेन. नागरिकांचे प्रश्न सोडवणं माझ्यासाठी कठीण नाही. त्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मला माहिती आहेत. माहीमच्या जनतेसाठी मी नेहमी उपलब्ध असणार आहे. माहीमकरांच्या प्रश्नांसाठी मी एक वेगळा दिवस ठेवणार आहे. ज्यामध्ये ते त्यांचे प्रश्न आणि समस्या मांडतील. असं अमित ठाकरे म्हणाले.