लातूर : लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अमित देशमुख यांची ही विजयाची हॅट्रिक आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी काँग्रेसचा गड कायम राखलाय. त्यांनी भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा ४२ हजार ५० मतांनी पराभव करून विजयाची हॅट्रिक साधली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  


२००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा अमित देशमुख निवडून आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काही काळ राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. आता तिसऱ्यांदा ते विधानसभेच्या आखाड्यात उतरुन विजयी ठरले आहेत.


विलासराव देशमुखांच्या निधनानंतर अमित देशमुखांनी लातूर जिल्हा काँग्रेसची धुरा समर्थपणे पेलली. इंजिनिअर असलेले अमित देशमुख १९९९ पासून ते लातूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. 


 


 


दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघातून निवडून आले. तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. धीरज देशमुख १ लाख ३४ हजार ६१५ मतांनी विजयी झाले आहेत.