मुंबई : गृहविभागाचे तत्कालीन विशेष प्रधान सचिन अमिताभ गुप्ता यांनी स्वत:च वाधवान कुटुंबीयांना ल़ॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठीचं विशेष परवानगी पत्र दिलं होतं. चौकशी समितीसमोर हा मोठा खुलासा आता तपासातून समोर आला आहे. शिवाय त्यांच्यावर कोणत्याही प्रकराचा दबाव नसून विनाकारण या गोष्टीचं राजकारण केलं जात असल्याचं मत त्यांनी मांडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ गुप्ता यांची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. जो लवकरच सार्वजनिकही करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, वाधवान कुटुंबाला सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आलं असून, त्यांना मुंबईला आणण्यात आलं आहे. 


वाधवान कुटुंबाने लॉकडाऊनदरम्यान केलेल्या प्रवास प्रकरणानंतर यावर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आले. पण, विनाकारण राजकारण केलं गेलं असून, ते आपले कौटुंबीक मित्र असल्याचं गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर सांगितलं. शिवाय आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याची बाबही त्यांनी समोर ठेवली. 


काय म्हणाले अनिल देशमुख?


चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार खुद्द अमिताभ गुप्ता यांनीच पत्र दिल्याची कबुली दिली आहे. या अहवालाची फाईल तया होऊन ती मुख्यमंत्र्यांकडेही सादर करण्यात येणार असून, चौकशीचा हा अहवाल येत्या काळात सार्वजनिक करण्यात येणार आहे. 



नेमकं प्रकरण काय होतं? 


राज्यात एकिकडे CORONAVIRUS कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं होत असतानाच दुसरीकडे यादरम्यान नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबीयांना केलेल्या या प्रवासान बरंच राजकारण रंगलं. संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं असतानाही यादरम्यान महाबळेश्वर रोखाने प्रवास करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांच्या या प्रवासाची सीबीआय चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वाधवान यांच्यासह इतर २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली होती.