हेमंत चापुडे / पुणे : Amol Kolhe Dance  : शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe)यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या तेजस झोडगे यांच्या लग्नात चक्क डान्स केला. वाजंत्री वाजवत असताना खासदार कोल्हे यांना नाचण्याचा मोह अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अमोल कोल्हे हे थिरकतांना दिसत आहेत. (Amol Kolhe Dance at Junnar) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल कोल्हे हे जनतेमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ते आपल्या मतदारसंघातील किंवा इतरही लग्न समारंभात सहभागी होत असतात. अशाच एका लग्नसमारंभात सहभागी झाले होते.  दोन दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी सचिवाचे नारायणगाव येथे लग्न होते. या लग्नात नवरदेवासोबत डॉ. कोल्हे यांनी ताशा, हलगी आणि पिपाणीच्या नादावर ठेका धरला, याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे बैलगाडी शर्यतीत घोडीवर बसले होते. त्यावेळी ते चर्चेत आले होते. त्यानंतर आज या लग्नात त्यांनी जो ठेका धरला तो चांगलाच चर्चेत आला आहे.