अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचं अपहरण करून या प्रकरणाचा लव्ह जिहादचा (Love Jihad) संबंध असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि  भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) , भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला होता. मात्र परवा रात्री सदर तरुणी सातारा इथं सापडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान त्या तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नाही मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे असा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला होता. आता लव्ह जिहादचा आरोप करणं खासदार नवनीत राणा यांना भोवलं आहे. खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कथित लव जिहाद प्रकरणात संबधीत मुलाला धमकावल्याचा आणि बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचीही तक्रारीत नोंद आहे. 


खासदार नवनीत राणांचा राजापेठ पोलीस ठाण्यात राडा
खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राडा केला होता. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसंच पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत जवळपास 20 मिनिटं पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. राणा दाम्पत्याने पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते.